स्वतः ला पेटवून घेत महिलेची दुसऱ्या मजल्यावरून उडी .
नगर शहरातील तारकपूर परिसरात राहणाऱ्या एका महिलेले स्वतः ला पेटवून घेत महिलेने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना सोमवारी दुपारी १२ चा सुमारास घडली . या घटने मुळे परिसरात खळबळ उडाली आहे . पूजा मनोहर चुग ( वय ३३ ) असे महिलेचे नाव असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत .
सोमवारी दुपारचा वेळेत हि महिला ओरडत आपल्या घरचा दुसऱ्या मजल्यावरील गच्चीत आली आणि तिने पेटवून घेत उडी मारली . हा प्रकार अनेक नागरिकांनी डोळ्याने पहिला ,त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे . महिलेने उडी मारताच तेथील नागरिकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले .
दरम्यान घटनेची माहिती होताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले . या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी नोंद करून घेतली असून त्यानुसार अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले .