२४ एसटी कामगार बडतर्फ

परिवहन मंडळाचा आव्हानानंतर हि कामावर हजर न होणाऱ्या कामगारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे . आतापर्यंत महा मंडळाने जिल्ह्यातील २४ कामगारांना बडतर्फ केले आहे . बडतर्फ कामगारांना पुन्हा एस टी महामंडळात एंट्री मिळणार नसल्याचे संकेत महामंडळाने दिले आहेत . दरम्यान जिल्ह्यातील २९० कामगारांना निलंबित करण्यात आले आहे . त्यातील उर्वरित २६६ जणांवर कारवाई ची टांगती तलवार कायम आहे . महामंडळाने राज्य शासनात विलीनीकरण व्हावे   या मागणीसाठी मागील ५१ दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले आहे . त्यामुळे बस सेवा अद्यापही बंदच आहे . जिल्ह्यातील चार हजार कामगार आंदोलनात सहभागी होते . महामंडळाने कामगारांना निलम्बित करण्याचा इशारा दिला होता . इशारा देऊनही कामगार कामावर हजर न झाल्याने महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरु केली .
२० दिवसांपूर्वी जिल्हातील २६२ कामगारांना निलंबित करण्यात आले होते . जिल्हातील ३२ कामगार कामावर परत आल्याने त्यांचे निलंबन रद्द झाले आहे . मात्र अद्यापही संप सुरु असल्याने बडतर्फीची कारवाई सुरु झालीय . जिल्ह्यात २९० कामगारांना निलंबित करण्यात आले होते .त्यातील आतापर्यंत २४ जणांना बडतर्फ करण्यात आले आहे . उर्वरित कामगारांवरही  बडतर्फीची टांगती तलवार कायम आहे .