उर्दू शिक्षण संस्थांचा 100 कोटींचा घोटाळा? आमदार संग्राम जगताप यांचा विधिमंडळात पर्दाफाश
एसआयटी चौकशी सुरू केली जाईल



नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं उर्दू शिक्षण संस्थांनी शासनाचा तब्बल 100 कोटींपेक्षा अधिक निधी लाटल्याचा आरोप समोर आला आहे! आमदार संग्राम जगताप यांनी ही गंभीर बाब थेट विधिमंडळात मांडत सरकारचा खडसून जाब विचारला.
जगताप यांनी उघड केलेले धक्कादायक तपशील :
- शिक्षण संस्थांनी बनावट कागदपत्रं तयार करून नवीन तुकड्यांना मंजुरी मिळवली
- शाळांमध्ये कधीही काम न केलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांची खोटी भरती दाखवली
- मागील तारखांची बनावट नेमणूक दाखवून सरकारी वेतन उचललं
- यामध्ये शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी यांचाही सहभाग
- सिटीजन वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीसह अनेक संस्थांवर संशयाची सुई
१० जून रोजी नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, जगताप यांनी एसआयटी व आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
यावर शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी लगेच उत्तर देत सांगितले की, एसआयटी चौकशी सुरू केली जाईल आणि उच्च न्यायालयातील सुनावणीतही शासन आपली भूमिका स्पष्ट करेल.
या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराची काळी बाजू पुन्हा एकदा समोर आली आहे. आता सोशल मीडियावर लोकांची एकच मागणी —
“नियम तोडणाऱ्यांना शिक्षा हवी, शिक्षणाचा बाजार नको!”
#UrduEducationScam #SITInquiry #MLAJagtapExposedScam #EducationCorruption #MaharashtraPolitics