दिव्यांग बांधवांसाठी नवजीवनाची संधी!

जामखेडमध्ये मोफत कृत्रिम हात-पाय बसविणे शिबीर यशस्वीपणे पार!

✋
 दिव्यांग बांधवांसाठी नवजीवनाची संधी!

जामखेडमध्ये मोफत कृत्रिम हात-पाय बसविणे शिबीर यशस्वीपणे पार!

जामखेड (ता. १९ जुलै):
अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी एक आशादायी पाऊल उचलण्यात आलं आहे. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, एलिम्को कानपूर आणि SR ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड येथे मोफत कृत्रिम हात-पाय बसविण्याच्या भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं.

📍 ठिकाण: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जामखेड
👨‍🦽 लाभार्थी: तब्बल १०० अस्थिव्यंग दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घेतला.
🛠️ सेवा: कॅपिलर मोजमाप, तात्काळ कृत्रिम अवयव बसवणे – तेही मोफत!

कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते –
✨ विस्तार अधिकारी विजय शेवाळे,
✨ केंद्रप्रमुख राम निकम,
✨ प्रहार पक्ष तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार,
✨ आदर्श फाउंडेशन अध्यक्ष आकाश शेठ बाफना,
✨ करण ढवळे, ॲड. अरबाज सय्यद, डॉ. यशस चुंबळे, नासीर सय्यद आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते.

कार्यक्रमात बोलताना आकाश शेठ बाफना म्हणाले, “हे शिबीर म्हणजे फक्त उपचार नव्हे, तर दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनविण्याचं एक मोठं पाऊल आहे.” त्यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

नय्युम सुभेदार यांनी बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांच्या मदतीसाठी सातत्याने काम सुरू असल्याचं सांगितलं.

🫶 समाजातील अशा उपक्रमांमुळे दिव्यांग बांधवांना आत्मविश्वास, स्वाभिमान आणि नव्या संधी मिळतात.
📢 चला, ही बातमी शेअर करून सकारात्मकतेचा संदेश पसरवूया!