⚡ वारंवार वीज खंडित! रभाजी नगर, वैष्णव नगर, भूषण नगरकर संतप्त!
🔌 "जुनी डीपी, नवे त्रास – नवीन डीपी कुठंय?" – आमदार संग्राम जगताप यांना निवेदन
⚡ वारंवार वीज खंडित! रभाजी नगर, वैष्णव नगर, भूषण नगरकर संतप्त!
🔌 “जुनी डीपी, नवे त्रास – नवीन डीपी कुठंय?” – आमदार संग्राम जगताप यांना निवेदन
नगर (प्रतिनिधी) – केडगावच्या प्रभाग क्र. 16 मधील रभाजी नगर, वैष्णव नगर, भूषण नगरसह परिसरातील नागरिक अक्षरशः वैतागलेत! कारण – वारंवार वीज खंडित होणे.
एका जुन्या डीपीवर तब्बल तीन वसाहतींचा भार… परिणामी, दिवसातून अनेक वेळा लाईट जातेय, घरगुती कामं अर्धवट, विद्यार्थ्यांचा अभ्यास बिघडतोय आणि नागरिक चिडलेत.
या त्रासाला कंटाळून भीमाशंकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज कराळे आणि स्थानिकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन, “नवीन आणि अधिक क्षमतेची डीपी तात्काळ उभारण्यात यावी” अशी मागणी केली.
“लोकसंख्या वाढली, घरं वाढली, कनेक्शन वाढलं… पण डीपी मात्र जुन्याच काळातली!” असं म्हणत मनोज कराळेंनी या समस्येकडे लक्ष वेधलं.
या वेळी शारदा राठोड, सुवर्णा वाघ, राजश्री साळवे, मंजू निमसे, संतोष राठोड, प्रकाश चोथे, संध्या अंधारे आदींनी आपली अस्वस्थता व्यक्त केली.
📢 नागरिकांची ठाम मागणी –
“नवीन डीपी नाही, तर आंदोलन अटळ!”
आता बघायचं, महावितरण विभाग आणि आमदार संग्राम जगताप यांच्याकडून या मागणीला कितपत प्रतिसाद मिळतो…