पावसाने दगा दिला, पण विखेंचा निर्णय ‘सिंचन’ ठरला!
| 1 लाख हेक्टरसाठी पाणी सोडलं जाणार!
अहिल्यानगर LIVE अपडेट
पावसाची ओढ आणि खरीपाचा ताण पाहता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कुकडीच्या डाव्या आणि घोडच्या दोन्ही कालव्यांतून गुरुवारी रात्रीपासून आवर्तन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्णयाचा थेट फायदा:
अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील 5 तालुक्यांमधील सुमारे 1 लाख हेक्टर शेतीला होणार आहे.
धरणात ओव्हरफ्लो झालेलं पाणी आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार!
श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, शिरूर आणि करमाळा तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवण्याचं टार्गेट!
मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर जलसंपदा विभागाला “कटाक्षाने नियोजन करा, शेवटच्या शेतकऱ्यालाही पाणी मिळायलाच हवं!” असा ठाम संदेश विखे पाटलांनी दिला.
पावसाने पाठ फिरवल्यानं खरीपाची पेरणी धोक्यात येण्याची शक्यता होती, त्यामुळेच लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनो, हे केवळ पाणी नव्हे – तुमच्या मेहनतीला दिलेलं बळ आहे!
#WaterForKharif #VikhePatil #IrrigationUpdate #AhilyanagarNews #MetroNewsVirals #ShetiLive #FarmersFirst #BreakingAgriculture