BREAKING | चोरीच्या संशयिताचा मृत्यू – सुपेमध्ये नागरिकांच्या मारहाणीप्रकरणी चौघांवर खुनाचा गुन्हा!
"चोर पकडला, पण कायदा विसरला?"


अहिल्यानगर – सुपे, पारनेर तालुका
“चोर पकडला, पण कायदा विसरला?”
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर 23 जुलैच्या रात्री 2:30 च्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. सुपे येथील पवारवाडीनजीक एका खासगी कंपनीमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्याला नागरिकांनी पकडून भररस्त्यात बेदम मारहाण केली. मात्र ही शिक्षा जीवावर बेतली! 
संशयित चोर हितेशकुमार रविश्वरप्रसाद (रा. पनवेल, मूळ उत्तर प्रदेश) याला पळून जात असताना म्हसणे फाटा टोल नाका येथे नागरिकांनी पकडले आणि मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, मात्र काही तासांत त्याची तब्येत बिघडली आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

शवविच्छेदन अहवालानुसार, मृत्यूचा थेट संबंध मारहाणीशी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही घटना उघडकीस आल्यानंतर, पोलिसांनी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग केला.
सीसीटीव्ही फुटेजने दिला धक्का!
टोलनाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये चार नागरिक मारहाणी करताना स्पष्टपणे दिसून आले. त्यानुसार, शरद पवार, अमोल पवार, अक्षय सुपेकर आणि अमित सुपेकर (सर्व रा. सुपे, ता. पारनेर) यांच्यावर मनुष्यवधाचा (खुनाचा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. चोरीचा संशय असले तरी, “कायद्याच्या बाहेरची शिक्षा – मृत्यूचा फतवा?” असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.
या घटनेने एक मोठा प्रश्न उभा केला आहे – “चोर पकडणे योग्य, पण त्याला ठोसे देणे न्याय्य का?” 
तुमचं मत काय? कायद्यानं चालायचं की भावनांनी? कमेंट करा, शेअर करा!
#SupéViolence #JusticeForAll #CCTVTruth #ViralNews #MetroPortalLive 
