टॉयलेटमध्ये फोन वापरता? मग हे वाचा – तुमचा फोन बनतोय ‘जंतूंचं घर’!
तुमचा मोबाईल – तुमचा बेस्ट फ्रेंड… पण तोच तुमचं आरोग्य बिघडवत असेल, तर?
हो! आपण जेवताना, स्वयंपाक करताना, आणि अगदी टॉयलेटमध्येही फोन वापरतो. पण विचार करा – फोनवर किती बॅक्टेरिया जमा होत असतील? संशोधनानुसार, १ मोबाईलवर तब्बल २२०० पेक्षा जास्त सूक्ष्म जीव असतात – त्यात ८८२ बॅक्टेरिया, १२२२ विषाणू, ८८ फंगस आणि ५ प्रोटिस्ट्स!
(थोडक्यात – टॉयलेट सीटपेक्षा फोन घाणेरडा असतो!)
हे चुकूनही करू नका!
फोन क्लिन करताना काही लोक विंडो क्लिनर, व्हिनेगर, ब्लीच, स्प्रे वापरतात – पण ते स्क्रीन, टच सेन्सिटिव्हिटी आणि वॉटरप्रूफ सीलिंग खराब करू शकतात.
मग, फोन कसा स्वच्छ कराल?
- चार्जर आणि कव्हर वेगळं करा
- चार्जिंग पोर्ट, स्पीकर्ससाठी अँटी-स्टॅटिक ब्रश वापरा
- ७०% आयसोप्रोपिल अल्कोहोलचे वाइप्स किंवा मायक्रोफायबर कापड वापरा
- द्रव थेट फोनवर फवारू नका
- सामान्य परिस्थितीत आठवड्यातून एकदा फोन स्वच्छ करा
- जर तुम्ही फोन जिम, हॉस्पिटल, किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये नेत असाल, तर दररोज क्लीन करा!
“फक्त हात धुतो, पण फोन विसरतो!”
फोनवरचे जंतू तुम्हाला सर्दी, ताप, पोटदुखी आणि इतर संसर्गांना बळी पाडू शकतात. म्हणून, फोनवर प्रेम करा, पण त्याला स्वच्छ ठेवा!

हे चुकूनही करू नका!
मग, फोन कसा स्वच्छ कराल?
“फक्त हात धुतो, पण फोन विसरतो!”