प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर ₹1.32 लाखाचं कर्ज! सरकारचं ‘क्रेडिट कार्ड’ बेधुंद!
दिल्ली | Metro News Special
देशातल्या प्रत्येक व्यक्तीवर सध्या सरासरी ₹1,32,059.66 कर्ज आहे! म्हणजे पाळण्यातला बाळ असो की निवृत्त आजोबा – सरकारच्या कर्जाचा ओझा सर्वांच्या डोक्यावर समान!
ही आकडेवारी ३१ मार्च २०२५ अखेरची असून, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) लोकसंख्या अंदाजावर आधारित आहे.
यामध्ये फक्त केंद्र सरकारचं कर्ज गृहित धरलं आहे. राज्यांचं नाही!
फक्त ४ वर्षांत व्याजाचा खर्च ३७% वाढला!
सरकारने घेतलेल्या कर्जावर फक्त व्याज भरण्यासाठी २०२५-२६ मध्ये ₹12.76 लाख कोटी खर्च होणार आहेत.
हेच व्याज २०२२-२३ मध्ये होतं ₹9.29 लाख कोटी — म्हणजे अवघ्या ४ वर्षांत तब्बल ३७.३५% वाढ!
सरकारचा प्लान काय?
सरकारनं फायनान्शियल कंट्रोल ठेवण्यासाठी २०२५-२६ मध्ये वित्तीय तूट GDP च्या ४.४% वर आणण्याचं उद्दिष्ट ठेवलंय.
हे यशस्वी झालं, तर:
कर्ज वाढीला आळा
व्याजाचा खर्च कमी
कर भरणाऱ्यांवरील ताण कमी
नाहीतर… सामान्य नागरिक भरपाई करणार?
विशेषत: जर करप्रणाली, खर्च कार्यक्षमता आणि सरकारी उसनवारींमध्ये सुधारणा केली नाही, तर
२०३१ पर्यंत सरकारी कर्ज GDP च्या ५०% वर जाईल – आणि परिणामी:
सामान्य जनतेवर कराचा भलामोठा बोजा येणार!
विचार करा – तुम्ही काहीही न करता सरकारच्या उधारीचे व्याज भरताय!
शेअर करा आणि या आर्थिक सत्याची जाणीव सर्वांना करून द्या!

फक्त ४ वर्षांत व्याजाचा खर्च ३७% वाढला!
सरकारचा प्लान काय?
नाहीतर… सामान्य नागरिक भरपाई करणार?
विचार करा – तुम्ही काहीही न करता सरकारच्या उधारीचे व्याज भरताय!