“१० हजार निराधार KEYC च्या फंदात अडकले!”

 मदतीचा पैसा मिळेना… प्रशासनही हतबल!

🔴
 “१० हजार निराधार KEYC च्या फंदात अडकले!”
➡️ मदतीचा पैसा मिळेना… प्रशासनही हतबल!

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – “सरकारची मदत हवी… पण तुमचं KYC झालं पाहिजे!”
जिल्ह्यात तब्बल ९ हजार ७०४ निराधार लाभार्थी आधार KYC अपूर्ण असल्यामुळे योजनांचे पैसे मिळवू शकलेले नाहीत! संजय गांधी आणि इंदिरा गांधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या महिन्याला १५०० रुपयांवर त्यांच्या जीवनाचा खर्च चालतोय… पण बँकेत पैसे पोहचतच नाहीत!

प्रशासन म्हणतं – “लाभार्थ्यांचा संपर्कच होत नाही… बरेच जण गावाकडचे, वृद्ध, मोबाईलही नाहीत!”
KYC पूर्ण न झाल्यामुळे हजारो निराधारांना औषधं, जेवण, दरमहा लागणारे खर्च उभे करणं कठीण झालंय.


📌 काय अडचण आहे?

  • ऑनलाइन अर्ज भरावा लागतो
  • बँक खातं आधारला लिंक असावं लागतं
  • ई-KYC अनिवार्य आहे
    ➡️ पण वृद्ध, अशिक्षित लाभार्थींसाठी ही प्रक्रिया कठीण बनलीय!

🧓🏻 कसोटीला निराधारांचे जीवन…

संजय गांधी योजनेतून मिळतात ₹600
इंदिरा गांधी योजनेतून मिळतात ₹900
मात्र KYC न झाल्यामुळे रक्कम थेट खात्यात जमा होऊ शकत नाही.


📊 तालुकानिहाय KYC प्रलंबित लाभार्थींची संख्या

(एकूण लाभार्थींच्या कंसात प्रलंबित केवायसी):

  • पारनेर – २२,७४२ (१,६१०)
  • पाथर्डी – ९,५४७ (९२२)
  • नगर शहर – ४,९१४ (१०१)
  • अकोले – ५,६८८ (१७८)
  • संगमनेर – ११,५८६ (१,१८९)
  • शेवगाव – १८,९१७ (१,५६९)
  • श्रीगोंदे – ७,८६० (९६०)
  • राहाता – ११,६६२ (१,०८४)
    … आणि असेच इतर तालुक्यांत!

🔔 येतोय पुढचा मोठा निर्णय?

प्रशासन विशेष मोहीम राबवण्याच्या तयारीत!
➡️ ग्रामसेवक, तलाठी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने KYC पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू.


 

👉 तुमचं किंवा आपल्या ओळखीचं कोणाचं KYC प्रलंबित आहे का?