111 फूट लांब तिरंगा पदयात्रा उत्साहात संपन्न

भारत माता की-जय, वंदे मातरम या जय घोषात तिरंगा पदयात्रा संपन्न झाली. नगर येथे भारताच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून १११ फूट लांब तिरंगा पदयात्रेचे आयोजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आले होते. या पदयात्रेची सुरुवात ITI महाविद्यालय, नगर येथून पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, एन एन सथथा महाविद्यालयाचे प्राचार्य, विशाल पांडे सर, अभाविप शहर मंत्री अनुष्का सहस्त्रबुद्धे , जिल्हा संयोजक अजिंक्य गुरावे, कार्यक्रम प्रमुख व जिल्हा सहसंयोजक यश नाईक ,यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमा पूजन व तिरंगा पूजन करून करण्यात आली.
ITI महाविद्यालय – आनंदधाम -महात्मा फुले चौक मार्गे शिवतीर्थ मार्केटयार्ड या ठिकाणी पदयात्रेचा राष्ट्रगीत होऊन समारोप झाला. या कार्यक्रमात अभाविप राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य व शहरमंत्री अनुष्का सहस्त्रबुद्धे यांनी संबोधित केले. ITI व एन एन सथथा महाविद्यालयातुन शेकडो संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनीं व शुभम कुलकर्णी, आयुष पाडळे,रोहित बडवे ,अभिषेक पवार,कृष्णा अकोलकर,ओंकार पाठक, सुबोध सोनवणे,प्रा.प्रशांत शेलार,अभाविप जिल्हा संघटनमंत्री चेतनजी पाटील आदी उपस्थित होते.