१५ वर्षांची धावपळ अखेर रंगत आली!
सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश, पोंभूर्णा एमआयडीसी लवकरच वास्तवात!
१५ वर्षांची धावपळ अखेर रंगत आली! सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश, पोंभूर्णा एमआयडीसी लवकरच वास्तवात!
मुंबई: तब्बल १५ वर्षांपासून पाठपुरावा करत असलेले आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आता यशाच्या उंबरठ्यावर आहे. राज्याचे उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी मुनगंटीवार यांना “लवकरच एमआयडीसी सुरू होईल” असे स्पष्ट आश्वासन दिले आहे.
पत्रांचा प्रवास, १५ वर्षांचा वनवास!
२००९ पासून सुरू असलेला हा पत्रांचा आणि बैठकींचा प्रवास म्हणजे अक्षरशः ‘फॉलोअप लेजेंड’! २००९ पासून २०१२ पर्यंत असंख्य पत्रे, बैठका, आणि सरकारी दिरंगाईच्या कहाण्या मुनगंटीवार यांनी सभागृहात मांडल्या. ते म्हणाले, “माझी आई सांगायची ती ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ गोष्ट आठवते, कारण मी सतत म्हणतोय – ‘दार उघड’, पण अधिकारी काही ऐकत नाहीत!”
“नारायणावर विश्वास ठेवला, पण…”
नदीपासूनचे अंतर मोजण्यास १० वर्षे लावणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध करत मुनगंटीवार म्हणाले, “मी नारायण राणेंना १० पत्र पाठवली. त्यांनी सांगितलं, फक्त फॉलोअप करू नका, मी काम करतो. त्यांचं नावच नारायण… विश्वास ठेवला, पण पुढे काहीच नाही.”
चार मागण्या, तीन महिन्यांचं अल्टिमेटम!
मुनगंटीवार यांनी मंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे स्पष्ट मागण्या ठेवल्या:
- कामास कारणीभूत अधिकाऱ्यांना बाजूला ठेवा.
- चंद्रपूर दौऱ्यावर या.
- पोंभूर्णा येथे ‘उद्योग मित्र परिषद’ घ्या.
- शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या.
आणि त्यावर इंद्रनील नाईक यांनीही स्पष्ट शब्दात उत्तर दिलं:
- अधिवेशन काळात बैठक होणार!
- ‘उद्योग मित्र’ परिषद मान्य!
- उर्वरित भूसंपादन ६० दिवसांत पूर्ण!
- आठवड्याला प्रगती अहवाल दिला जाईल!
थेट खरेदीला मंजुरी, शेतकऱ्यांना २.३५ कोटी मोबदला!
२०१९ मध्ये १०२.५० हेक्टर क्षेत्रासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली होती. यातील ४२.५९ हेक्टर जमिनी थेट खरेदीद्वारे घेतल्या गेल्या असून, शेतकऱ्यांना २ कोटी ३५ लाख रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.
“जे माझं काम करत गेले, ते पुढे कॅबिनेट मंत्री झाले!”
संपूर्ण विषयावर भाष्य करत मुनगंटीवार म्हणाले, “जे जे माझं काम करत गेले, ते पुढे कॅबिनेट मंत्री झालेत!” — आणि सभागृहात एक हास्याची लाट उसळली.

#PombhurnaMIDC #SudhirMungantiwar #VidarbhaDevelopment #ChandrapurRising #MaharashtraPolitics #MetroNewsExclusive #BreakingNews