दिशा सालियन प्रकरणात मोठा खुलासा!
आदित्य ठाकरेंना 'क्लीन चीट', संजय राऊतांचा फडणवीस-राणेंना थेट सवाल – "नाक घासून माफी मागा!"
दिशा सालियन प्रकरणात मोठा खुलासा! आदित्य ठाकरेंना ‘क्लीन चीट’, संजय राऊतांचा फडणवीस-राणेंना थेट सवाल – “नाक घासून माफी मागा!”
मुंबई:
दिशा सालियन आत्महत्याप्रकरणाचा तपास करत असलेल्या SIT चा मोठा निर्णय! शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचं स्पष्ट करत त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस, नारायण राणे आणि त्यांचा मुलगा ‘टिल्या’ (नितेश राणे) यांच्यावर निशाणा साधला आहे. “एका तरुण, अभ्यासू नेत्यावर खोटे आरोप करून बदनामी केली. आता नैतिकता शिल्लक असेल तर नाक घासून माफी मागा!” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
“SIT आमची नाही, तुमच्याच सरकारची!” – राऊत
राऊत म्हणाले, “दिशाच्या मृत्यूमागे हत्या नाही, बलात्कार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. ही आत्महत्या होती. SIT म्हणजे तुमचंच यंत्रणं – मग आता काय म्हणणार?”
“सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत आरोपांचं सैराट राजकारण केलं गेलं. आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं गेलं. पण आम्ही मागे हटलो नाही, कारण सत्य आमच्यासोबत होतं.” – असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“शिवसेनेचं नेतृत्व खच्ची करण्याचा डाव फसला!”
“त्यांनी शिवसेनेवर, आदित्य ठाकरेंवर नावं ठेवली. पण आता सत्य बाहेर आलं आहे. फडणवीस, राणे आणि त्यांच्या ‘बडबड्या’ मुलाने आदित्य ठाकरेंची माफी मागावी. नाहीतर जनता विचारेल – कोण खरा, कोण खोटा?” – असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
दिशा सालियन प्रकरण: थोडक्यात
- दिशा सालियन हिने ८ जून २०२० रोजी १४व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.
- काही नेत्यांनी तिच्या मृत्यूमागे ‘हत्या व बलात्कार’चा आरोप करत आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं.
- मात्र SIT च्या अहवालात कुठलाही घातपात वा अत्याचाराचे पुरावे आढळलेले नाहीत.
- आदित्य ठाकरे यांनी खोट्या आरोपांना विरोध करत न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.
- दिशाच्या वडिलांनीही पोलिस तपासावर समाधान व्यक्त केलं होतं.
“सत्तेचा गैरवापर केला, आता जनतेच्या न्यायासमोर जबाब द्या!”
“तुम्ही एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करता, बदनाम करता आणि नंतर शांत बसता? पण लक्षात ठेवा, जनतेसमोर सत्य आलं की, तुमच्यावरच डाव उलटेल,” असा इशाराही राऊतांनी दिला.

#AdityaThackeray #DishaSalianCase #CleanChit #SanjayRaut #DevendraFadnavis #NarayanRane #ShivSena #MetroNews #ViralNews #JusticePrevails