“गांजा, मटका, दारूवाल्यांचं मत नको!” – डॉ. सुजय विखेंची शिर्डीत थेट फटकेबाजी! 

 "भले मतदान टक्का कमी होईल, पण गुन्हेगारीला 'नो एन्ट्री'च!"

🔥
 “गांजा, मटका, दारूवाल्यांचं मत नको!” – डॉ. सुजय विखेंची शिर्डीत थेट फटकेबाजी! 
🔥

📍 शिर्डी गुन्हेगारीमुक्त करण्याचं ऑपरेशन जोरात!
📣 “भले मतदान टक्का कमी होईल, पण गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’च!”

शिर्डी (प्रतिनिधी) –
शिर्डीतील शॉपिंग कॉम्प्लेक्स गाळेधारकांना ५०% भाडे सवलत दिल्याबद्दल युवा कार्यकर्त्यांकडून डॉ. सुजय विखे पाटील यांचा भव्य सत्कार झाला. मात्र या कार्यक्रमात सत्कार नव्हे तर त्यांच्या बिनधास्त भाषणाचीच खऱ्या अर्थाने चर्चा रंगली!

🗣️ डॉ. विखे म्हणाले –

“शिर्डी गुन्हेगारीमुक्त करणं हे माझं ध्येय आहे. गांजा, मटका, व्हाईटनरवाले, दारू विक्रेते यांना कुठलीही संधी नाही. त्यांनी मला मत दिलं तरी नको!”


🚨 ‘ऑपरेशन क्लीन शिर्डी’ सुरू!

👉 खासगी MSF सुरक्षा यंत्रणा कार्यरत
👉 ८ दिवसांत ५ किलो गांजा जप्त
👉 रात्रीचे गस्त पथक सक्रीय – मटका, दारू टोळ्यांवर कारवाई
👉 गुन्हेगारांची दहशत संपली – नागरिक निर्भय


🗳️ “नगरपरिषदेवर आमचाच झेंडा!”

डॉ. विखे म्हणाले –

“कोणी कुठे गेले तरी शेवटी यायचं माझ्याकडेच! तीन पॅनल येतील, पण सत्ता मात्र आमच्याच हातात राहील. गोरगरिब जनतेचा विश्वास हेच आमचं बलस्थान आहे.”


🙏 साई संस्थानचा ‘ब्रेक दर्शन’ निर्णय स्वागतार्ह!

“साई दर्शन सुलभ झाल्याने छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना फायदा झाला. यामुळे हजारो भाविक समाधानाने दर्शन घेत आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.


 

👥 कार्यकर्त्यांचं विशेष कौतुक:
विकास गोंदकर, कैलाबापू कोते, अभय शेळके पाटील, रवी गोंदकर, सागर सावकारे यांचा मंचावर उल्लेख करत विशेष धन्यवाद दिले.