अहिल्यानगरमध्ये मनपाच्या निवडणुकीसाठी Big Update! प्रारूप प्रभाग रचना अंतिम टप्प्यात!
काय आहे या प्रभाग रचनेमागचं गणित?


अहिल्यानगर | 6 ऑगस्ट 2025
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी
प्रारूप प्रभाग रचनेचं काम आता जवळपास पूर्ण झालं आहे!
लवकरच हा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला जाणार असून, त्यानंतर तो राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार आहे. 

काय आहे या प्रभाग रचनेमागचं गणित?
2011 च्या जनगणनेनुसार
एक प्रभागात सरासरी 20,000 लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे. मात्र, आता नवीन मतदारांची नोंद वाढत असल्याने सुमारे 50,000 नव्या मतदारांची भर पडण्याची शक्यता आहे! 

मागील निवडणुकीत होते –
मतदार: 2,56,719
मतदान केंद्र: 337
आता होणार आहे –
मतदान केंद्रांची संख्या वाढून 400 च्या पार! 

हा प्रारूप आराखडा सादर झाल्यानंतर, 3 सप्टेंबर 2025 रोजी तो जाहीरपणे प्रसिद्ध केला जाणार आहे. यानंतर नागरिकांना हरकती आणि सूचना देण्यासाठी वेळ दिला जाईल. 
कशासाठी आहे ही प्रक्रिया?
सर्वसामान्य नागरिकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं, विकासाची कामं प्रभावीपणे पोहोचावी आणि निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात, यासाठी ही प्रभाग रचना अत्यंत महत्त्वाची आहे. 

आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे की, कोणता भाग कुठल्या प्रभागात जाईल, आणि आगामी निवडणुकीत कोणाचं गणित बसणार? 

#प्रभागरचना #अहिल्यानगरमनपा #MunicipalElections #MetroPortalNews #VotingMatters #UrbanUpdate #2025ElectionBuzz