२५ कोटी कामगार उद्या घेणार देश ठप्प! बँका, पोस्ट, ट्रान्सपोर्ट, कोळसा, महामार्ग सेवा होणार बंद! 

२५ कोटी कामगार रस्त्यावर उतरतील

 
🚨
२५ कोटी कामगार उद्या घेणार देश ठप्प! बँका, पोस्ट, ट्रान्सपोर्ट, कोळसा, महामार्ग सेवा होणार बंद! 🚨

🔥 देशभरात उद्या मोठा बवाल होणार आहे! बँका, पोस्ट, कोळसा खाणी, महामार्ग, बांधकाम आणि ट्रान्सपोर्टसह अनेक क्षेत्रातील तब्बल २५ कोटी कामगार रस्त्यावर उतरतील आणि देशव्यापी संप करणार आहेत.

📢 दहा मोठ्या केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांचे समर्थक संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे!

त्यांचे म्हणणे आहे की –

“सरकारचे कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिणे धोरण देशासाठी घातक आहेत… त्याविरोधात आता थेट मैदानात उतरण्याची वेळ आली आहे!”

👥 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या अमरजीत कौर म्हणाल्या की, २५ कोटींपेक्षा जास्त कर्मचारी आणि कामगार संपात सहभागी होणार आहेत, तर ग्रामीण भागात शेतकरीही आंदोलनात सहभागी होतील.

🚍 हिंद मजदूर सभेचे हरभजन सिंह सिद्ध यांनी सांगितले की –

“बँकिंग, पोस्ट, कोळसा खाणी, कारखाने, सार्वजनिक परिवहन या सेवा उद्या ठप्प होतील!”

📲 उद्याचा दिवस देशासाठी निर्णायक ठरणार आहे!
#IndiaBandh #WorkersProtest #25CroreVoices #BharatBandh2025 #LabourRights #SocialImpact