5 koti 27 lakh vikas kamancha shubharambh

संगमनेर तालुक्यातील ग्रामविकासांचा आ. थोरातांच्या हस्ते शुभारंभ

संगमनेर – तालुक्यातील चंदनापुरी येथे रविवार (ता.२८) रोजी ५ कोटी २७ लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडला. केंद्रातील भाजप सरकारने स्वायत्त असलेल्या ईडी व सीबीआय सारख्या संस्था गुलाम बनवुन त्यातून दबावाचे राजकारण सुरू केले आहे. देशात महागाई बेरोजगारी वाढली असून, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य माणूस अडचणीत आला आहे. परंतु सरकारचे त्याकडे लक्ष नसुन, जातिभेद आणि घमंड असणारे केंद्रातील भाजप सरकारला रोखण्याचे काम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आणि जनतेने केले. राज्यात आलेले सरकार जनतेला मान्य नाही. राज्यसरकारमध्ये ताळमेळ नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार आहे. 1985 पासून तालुक्यातील जनतेने खूप प्रेम केले. त्यामुळे राज्यात मिळालेल्या मोठ्या संधीचा सर्वसामान्यांच्या विकासासाठी उपयोग केला आहे. निळवंडे धरण कालवे यांच्यासह अनेक कामे मार्गी लावली. सतत काम करत राहणे, हे आपले वैशिष्ट्य आहे. राज्यात शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्याबरोबर आपल्याला मान मिळतो, हे जनतेचे प्रेम असून आगामी काळात सर्वांनी एकजुटीने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन आ. थोरात यांनी केले. तसेच दुष्काळी भागाला नवसंजीवनी देणारे निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले आहे. संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांसह येथील चांगल्या वातावरणामुळे तालुक्याचा लौकिक निर्माण झाला आहे. सततच्या विकास कामांमुळे येणाऱ्या विधानसभा निवडनुकीतही मोठे यश मिळणार आहे. राज्य महाविकास आघाडीचे सरकार असेल, असे सांगत केंद्रातील भाजप सरकारची घमेंड महाराष्ट्राने उतरवली असून राज्य सरकारच्या निवडणुकीपुरत्या असणाऱ्या फसव्या घोषणांना फसू नका. असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आ.थोरात हे अत्यंत नम्र स्वभावाचे व सर्वांना स्वातंत्र्य देणारे नेतृत्व आहे. आगामी काळात नाशिक – पुणे रेल्वे संगमनेर वरून जाण्यासाठी आपण पाठपुरावा करू असे आश्वासनही यावेळी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले. यानंतर कार्यक्रमात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, डॉक्टर जयश्री थोरात व मिलिंद कानवडे यांची भाषणे झाली. प्रस्ताविक सरपंच भाऊराव राहणे यांनी केले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून ५ कोटी २७ लाखांच्या निधीतून कामांच्या शुभारंभ प्रसंगी चंदनापुरी ग्रामस्थांनी आ.थोरात यांची भव्य मिरवणूक काढली होती. यावेळी ढोल ताशांचा गजरात, लेझीम पथक आणि पारंपारिक वेशभूषेत युवक सहभागी झाले होते. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात विकास कामांची गंगा आली आहे. तालुक्याचे कुटुंबप्रमुख म्हणून आपण सर्वजण त्यांचा आदर करतो. आ.थोरात यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुठे असुन सर्वांनी आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने काम करावे असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले. याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, विद्यमान आमदार सत्यजित तांबे, दुर्गा तांबे, युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ.जयश्री थोरात, बाबासाहेब ओहोळ, रणजितसिंह देशमुख, मिलिंद कानवडे, शंकरराव खेमनर, आर.बी राहणे आदींसह चंदनापुरीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.