कर्जत-जामखेडच्या ६ गावांना मिळाला विकासाचा बूस्ट!

 प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश – १.५ कोटींचा निधी मंजूर

🏡
 कर्जत-जामखेडच्या ६ गावांना मिळाला विकासाचा बूस्ट!
🎯 प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश – १.५ कोटींचा निधी मंजूर

कर्जत व जामखेड तालुक्यातील भांबोरा, सिध्दटेक, गुरव पिंपरी, हळगाव, साकत आणि अरणगाव या सहा ग्रामपंचायतींसाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानातून प्रत्येकी २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
✅ यामध्ये २० लाख ग्रामपंचायत इमारतीसाठी
✅ ५ लाख नागरी सुविधा केंद्रासाठी मिळणार आहेत.

📢 या निधीसाठी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि त्याला अखेर यश मिळालं आहे.

💻 नागरी सुविधा केंद्रांमधून मिळणार सेवा:
▪️ आधार कार्ड अपडेट
▪️ बँकिंग सेवा
▪️ उत्पन्न/निवासी दाखले
▪️ उज्ज्वला योजना, पीएम किसान, पेंशन योजना व इतर सेवा

🌐 यामुळे गावातच मिळणार डिजिटल सेवा, आणि नागरिकांना होणार मोठा फायदा!

📌 शिंदे म्हणाले, “गाव पातळीवर स्मार्ट सेवा देणं हे माझं ध्येय आहे. केंद्र व राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य करून गावांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे.”

🗳️ जि.प. आणि पं.स. निवडणुकांच्या तोंडावर प्रा. राम शिंदे यांनी खेचून आणलेल्या निधीमुळे गावागावात उत्साहाचं वातावरण आहे!
✨ कार्यकर्त्यांमध्ये जोश वाढलाय, आणि सामान्य नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

 

🔧 ‘स्मार्ट ग्रामपंचायत’ ही केवळ कल्पना न राहता, प्रत्यक्षात उतरते आहे – कर्जत-जामखेडच्या गावांमध्ये!