६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेस प्रारंभ!
अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा अहिल्यानगर केंद्रावरील स्पर्धेस नगर केंद्रावर प्रारंभ झाला. १३ डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. माऊली सभागृहात होणाऱ्या स्पर्धेसाठी १७ नाट्य संस्था सहभागी झाल्या आहेत. समन्वयकपदी सागर मेहेत्रे तर सहसमन्वयकपदी जालिंदर शिंदे यांची निवड करण्यात आली. गेल्या ६३ वर्षांपासून ही स्पर्धा सुरू आहे. रोज सायंकाळी ८ वाजता नाट्य प्रयोग सादर होणार आहे. नाममात्र दरामध्ये आपल्या जिल्ह्यातील कलावंतांची कला पाहण्यास मिळणार आहे, असे संचालक बिभीषण चवरे यांनी सांगितले.