15% कमिशनच्या लोभात 80 लाखांची फसवणूक!

नगरमध्ये व्यावसायिकावर मोठा फसवणूकचा प्रकार उघड!

⚠️
 15% कमिशनच्या लोभात 80 लाखांची फसवणूक!

नगरमध्ये व्यावसायिकावर मोठा फसवणूकचा प्रकार उघड!

🚨 विमान तिकीट व हॉटेल बुकिंग व्यवसायात गुंतवणूक करून 15% कमिशनचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल 80 लाखांची फसवणूक झाली आहे.

👉 ऑगस्ट 2024 मध्ये राहुल, एंजल, सुशिला जगताप आणि इब्राहीम सॅम्युअल यांनी ‘रिजॉईस इव्हेंट ऑर्गनायझेशन’ या कंपनीत गुंतवणूक केली.
👉 त्यांना महिन्याभरात चांगला परतावा व 15% कमिशन मिळणार असल्याचं सांगितलं गेलं.
👉 त्यानुसार राजेश बन्सल यांनी 4.70 कोटी रुपये गुंतवले.
👉 पण नंतर परतावा देण्यास टाळाटाळ सुरू झाली.
👉 मागणी केल्यावर फक्त 3.90 कोटी परत केले गेले, उरलेले 80 लाख आणि कमिशन अजूनही नाही!

🛑 बन्सल यांनी पोलिसांकडे तक्रार केली, पण कारवाई न झाल्यामुळे न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.

🕵️‍♂️ एमआयडीसी पोलिस आता तपास करत आहेत.


सतर्क रहा! मोठ्या परताव्याच्या आमिषाला फसवणूक समजून घ्या!

#फसवणूक #नगर #महाराष्ट्र #MetroPortal #FraudAlert #Justice