जिल्ह्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

अहमदनगर: भारतीय हवामान खात्याद्वारे जिल्ह्यात 9 व 10 रोजी विजांच्या कडकडाट्, वादळी वारा व अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथील दुरध्वनी क्रमांक 1077,0241-2323844/2356940 वर संपर्क साधावा. असे आवाहन राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.