लग्न कधी होणार? कंगनाचे नाव घेताच लाजले केंद्रीय मंत्री

कधी होणार कंगना रानावत आणि चिराग पासवान यांचे शुभमंगल

नवी दिल्ली – लोकसभेत नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर देशाचे सर्वात तरुण केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी समाधान व्यक्त करत, देशात अनेक तरुण आहेत जे बॅचलर आहेत. त्यांच्या भविष्याची सरकारला काळजी आहे. सरकारने आपल्या तरुणांच्या रोजगारासाठी अनेक योजना सुरू केल्या असुन मोठ्या संख्येने तरुणांना रोजगार देण्याचा विचार सरकार करत आहे, याचा मला आनंद आहे अश्या भावना अर्थसंकल्पाविषयी व्यक्त केल्या आहेत. यावेळी चिराग पासवान यांना माध्यमांनी लग्नाबद्दल प्रश्न विचारला असता, त्यावेळी ते चक्क लाजून हसले. चिराग पासवान यांना विचारण्यात आले कि, तुमचा एक चित्रपट ‘मिले ना मिले हम’ रिलीज झाला होता. त्यावेळी तुम्ही संसदेत आलात. चित्रपटामधील तुमची नायिका यादेखील आता मंडीच्या खासदार आहेत. संसदेत येताना तुमच्या आणि मंडीच्या खासदार कंगना राणौत यांची भेट झाली. त्या फोटोंची माध्यमांत बरीच चर्चा आहे. तुमची भावना त्यावेळी काय होती? हा प्रश्न ऐकून चिराग पासवान लाजले. निवडणूक प्रचारादरम्यानही त्यांना भेटण्यासाठी मी उत्सुक होतो. चित्रपटानंतर आमची फारशी भेट झाली नाही. गेली तीन वर्षे इतक्या चढउतारांनी भरलेली होती की, या काळात आमच्यात बोलणेही झाले नाही. खूप दिवसांनी त्यांची भेट झाली आणि खूप छान वाटले असे उत्तर खासदार चिराग पासवान यांनी दिले.