डेंगूचा आजार टाळण्यासाठी यशवंत डांगे यांचा सतर्कतेचा इशारा
आयुक्त यशवंत डांगे यांची आठ आठवडे डेंगूविरोधी मोहीम : येत्या रविवारी 4 ऑगस्ट रोजी मोहिमेचा तिसरा दिवस
अहमदनगर : अहमदनगरमध्ये डेंग्यूचे वाढते रुग्ण पाहता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून आशा सेविका व आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून यशवंत डांगे यांनी सर्वेक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आजार टाळण्यासाठी आयुक्त यशवंत डांगे यांनी आठ आठवड्याची डेंग्यू विरोधी मोहीम आखली आहे. येत्या रविवारी म्हणजे ४ ऑगस्ट रोजी या मोहिमेचा तिसरा दिवस असून या दिवशी सर्व नागरिकांनी आपल्या घरातील पाण्याच्या टाक्या,कुंड्या,किंवा कुलरमध्ये साठणारे पाणी काढून टाकावे. तसेच इतरही वस्तूमध्ये पाणी फार दिवस साठणार नाही. याची काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. कारण या पाण्यात डेंग्यू डासाची मादी अंडी घालते. पुढे यातून अळ्या बाहेर पडतात. आणि या अळ्यांचे डासात रूपांतर होते. त्यामुळे अशा डासांना पोषक वातावरण निर्माण होऊ न देण्यासाठी आपल्या घरात आणि आसपासच्या परिसरात पाणी साठणार नाही. याची काळजी घेण्याचे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे. या तसेच बदलत्या हवामानाने ताप, सर्दी, खोकला अशी प्रमुख लक्षणे रुग्णांमध्ये सध्या जाणवत आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम या रुग्णांवर जाणवू लागला आहे. त्यामुळे डेंग्यू, चिकूनगुनिया, निमोनियाचे अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयात ही उपचार घेत आहे.अहमदनगरमध्ये अनेक भागात संततधार पावसामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याच आवाहन यशवंत डांगे यांनी केलेले आहे.