ब्रेन स्ट्रोकनंतर अभिनेता राहुल रॉय आयसीयूबाहेर

स्पीच थेरपी सुरु

मुंबई :

कारगिलमध्ये शूटिंग करताना ब्रेन स्ट्रोक आलेला प्रख्यात अभिनेता राहुल रॉयच्या  प्रकृतीत काहीशी सुधारणा होत आहे.  राहुल रॉयला आयसीयूबाहेर आणण्यात आले असून त्याच्यावर स्पीच थेरपी करण्यात येत आहे.

राहुल रॉयला आयसीयूतून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले आहे. त्याच्यावर फिजिकल राहुलची प्रकृती पूर्णपणे सुधारण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं.  राहुल रॉयच्या सुदृढ आरोग्यासाठी चाहते सोशल मीडियावर प्रार्थना करत आहेत.
 
कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे अंशांमध्ये आहे. त्यामुळे राहुल रॉयला मेंदूघाताचा झटका आल्याचा अंदाज आहे.