अहमदनगर :
गेल्या काही दिवसांपासून केडगाव परिसरात चोरटयांनी अगदी उच्छाद मांडलाय . मंगळवारी संध्याकाळी ७. वाजता हे चोरटे एकनाथ नगर, श्रीकृष्ण नगर परिसरात दाखल झाले होते. चोरट्यांच्या भीतीने परिसरातील नागरिकांना ,युवकांना रात्रभर परिसरात गस्त घालावी लागत आहे. चोरट्यांच्या दहशतीमुळे संपूर्ण केडगावकरांची मात्र झोप उडाली आहे. गेल्या आठ्वड्यापासून चोरट्यांची टोळी हातात धारदार शस्त्रे घेऊन येत आहेत. याच दरम्यान मराठानगर आणि परिसरात एक दोन ठिकाणी घरफोड्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिक दिसताच चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून जातात मात्र जाताना नागरिकांवर तुफान दगडफेक करून जात असल्याच्या सरस घटना याठिकाणी घडल्या आहेत, हे चोरटे अगदी पोलिसांच्या सुद्धा हाती येत नसल्याने केडगावकरांची चिंता वाढली आहे.