विद्यार्थी केंद्राचे अहिल्यानगरला उद्घाटन!
अहिल्यानगर : छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या नावे शेतकरी विद्यार्थी सहायता केंद्राचे उद्घाटन नुकतेच झाले. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून हा प्रकल्प उभा राहणार असून, शेतकरी विद्यार्थी चळवळीसाठी हा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. छत्रपती चौथे शिवाजी महाराज विद्यार्थी सहायता केंद्राच्या उद्घाटन नुकतेच छत्रपती चौथे शिवाजी स्मारकात झाले. प्रास्ताविक करताना स्मायलिंग अस्मिता संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल म्हणाले की, आमच्या संघटनेची वाटचाल बुद्धिमत्ता व नीतिमत्ता या सूत्रावर चालते. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण असून, चांगले सहकारी व कामात सातत्य होतेच; परंतु लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीमुळे आम्ही हा टप्पा गाठू शकलो. स्वातंत्र्यासाठी स्वतःचे राज्य व प्राणाचे बलिदान देणाऱ्या छत्रपतींचा झाकलेला इतिहास आता पुढे येईल. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी नगरसेवक डॉ.सागर बोरूडे, जिल्हा मराठा संस्थेच्या कोषाध्यक्षा दीपलक्ष्मी म्हसआदी समवेत कार्यकर्ते उपस्थित होते.