दशहरी, चौसा, लंगडा आंब्याचा हंगामी बहर!
उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणात मार्केट यार्डात आवक — जबरदस्त मागणी

उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणात मार्केट यार्डात आवक — जबरदस्त मागणी
मार्केट यार्ड, ता. 22
लांबट-गोल आकाराचा, केशरी-पिवळसर रंगाचा आणि चवीलाही गोडसर असलेला उत्तर प्रदेशातील दशहरी, चौसा आणि लंगडा आंबा पुण्याच्या बाजारपेठेत धुमाकूळ घालत आहे.
रत्नागिरी हापूस आंब्याचा हंगाम संपल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात या आंब्याची आवक सुरू होते.
पावसाळ्यात या आंब्यांना प्रचंड मागणी असते, कारण हा आंबा टिकाऊ आणि चविष्ट असतो.
आवक कुठून होत आहे?
चौसा आंबा — बनारस
लंगडा आंबा — प्रयागराज
दशहरी आंबा — मलिहाबाद
हा हंगाम जून ते जुलै दरम्यान चालतो.
पुण्यातील मार्केट यार्ड व्यापारी सुयोग झेंडे यांच्या माहितीनुसार, उपनगरांसह सातारा, बारामती, इंदापूर, भिगवन, हुबळी येथूनही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
व्यापारी सत्यजित झेंडे म्हणतात:
“देशात फेब्रुवारीत केरळमधून आंब्याचा हंगाम सुरू होतो. नंतर आंध्र, कर्नाटक, रत्नागिरी, गुजरात आणि शेवटी जून-जुलैमध्ये उत्तर प्रदेशचा आंबा येतो. हा हंगामाचा शेवटचा आणि दर्जेदार आंबा आहे.”
चौसा आंबा:
चव: अतिशय गोड, रसाळ, सुगंधी
आकार: मोठा, थोडा लांबट
गर: रसाळ, गडद पिवळसर
आवक: 1000 बॉक्स (प्रत्येकी 5 किलो)
घाऊक दर: ₹400-₹450 प्रति किलो
किरकोळ दर: ₹130-₹150 प्रति किलो
दशहरी आंबा:
चव: गोडसर, सौम्य, मधुर
गर: गडद केशरी/पिवळसर
आवक: 6000 बॉक्स (प्रत्येकी 5 किलो)
घाऊक दर: ₹300-₹350 प्रति किलो
किरकोळ दर: ₹60-₹100 प्रति किलो
लंगडा आंबा:
चव: गोडसर, किंचित तुरट
आकार: मध्यम ते मोठा, थोडासा गोलाकार
गर: घट्ट, कमी रसाळ
आवक: 3000 बॉक्स (प्रत्येकी 5 किलो)
घाऊक दर: ₹400-₹450 प्रति किलो
किरकोळ दर: ₹130-₹150 प्रति किलो
पावसाळ्यात टिकाऊ आणि चविष्ट — यंदा उत्तर प्रदेश आंब्यांना जोरदार मागणी