रेखा जरी हत्याकांड

आरोपी सागर भिंगारदिवेची जामिनावर सुटका

🌐
 रेखा जरी हत्याकांड : आरोपी सागर भिंगारदिवेची जामिनावर सुटका; समर्थकांकडून मिरवणूक, शहरात संतापाची लाट

अहिल्यानगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरी हत्याकांडातील मुख्य आरोपी सागर भिंगारदिवे याची तात्पुरत्या जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याचा जोरदार जल्लोष करत समर्थकांनी चारचाकीतून मिरवणूक काढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

👉 भिंगारदिवे याला शनिवारी येथील सब जेलमधून सुटका करण्यात आली. तुरुंगाबाहेर त्याच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. समर्थकांनी त्याला खांद्यावर उचलून चारचाकीत बसवले आणि मिरवणूक काढली.

👉 रेखा जरी हत्याकांड प्रकरणात चार आरोपी अटकेत असून सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुख्य आरोपी सागर भिंगारदिवे याने सुपारी देऊन रेखा जरे यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. तो यापूर्वी नाशिक जेलमध्ये होता, आणि काही दिवसांपूर्वीच येथील सब जेलमध्ये हलवण्यात आला होता.

👉 भिंगारदिवे याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या पत्नीची प्रकृती ठिक नसल्याने तिच्या तपासणीसाठी आणि उपचारासाठी जामीन हवा असल्याचे कारण त्याच्या वकिलांनी पुढे मांडले. सरकार पक्षाने जामीन देऊ नये असे सांगितले असतानाही न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून जामीन मंजूर केला.

👉 या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

🔍 पोलीस कारवाईची शक्यता
या व्हायरल व्हिडिओ संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, “व्हिडिओची कसून चौकशी केली जाईल आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल.