
दुबई : इराणने आपल्या अणु तळांवर झालेल्या हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी कतारमधील अमेरिकेच्या अल-उदीद हवाई लष्करी तळावर ६ क्षेपणास्त्रे डागली.
दोहा शहरात स्फोटांचे आवाज ऐकू आले असून कतारच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने सर्व क्षेपणास्त्रे यशस्वीरित्या निष्क्रीय केली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अल-उदीद तळ हा मध्यपूर्वेतील अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ आहे, जिथे ८,००० ते १०,००० अमेरिकी सैनिक तैनात आहेत.
इराणने इराकमधील अमेरिकी तळांवरही क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे.
कतारने हल्ल्यापूर्वी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते आणि इराणला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
होर्मुझ कॉरिडॉर आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्व:
➡ होर्मुझ कॉरिडॉर पर्शियन खाडीला ओमानची खाडी व अरबी समुद्राशी जोडतो (लांबी: १६७ किमी).
➡ दररोज येथून १७ दशलक्ष बॅरल कच्चे तेल जगभर पाठवले जाते (जगाच्या एकूण वापराचे २०-३०%).
➡ पर्शियन खाडीतून बाहेर पडणाऱ्या तेलाचा ८८% भाग या मार्गावरून जातो.
जर हा जलमार्ग बंद झाला तर?
➡ तेलाचा पुरवठा कोलमडेल आणि किमती $१००-$१५० प्रति बॅरलवर पोहोचू शकतात (सध्या ~$८०).
➡ भारतासाठी प्रत्येक $१० वाढ जीडीपीच्या ०.५५% चालू खात्यात तूट वाढवू शकते आणि महागाई ०.३% ने वाढू शकते.
➡ पेट्रोल, डिझेल, विमान इंधन, सीएनजी, पीएनजी, प्रवास महाग होईल.
कोणत्या देशांवर परिणाम?
चीन: गरजेच्या ४५% तेलाची मागणी होर्मुझ मार्गावरून
भारत: गरजेच्या ४०% तेलाची मागणी
जर्मनी: ७५% कच्चे तेल
दक्षिण कोरिया: ६५% कच्चे तेल
इराण होर्मुझ कॉरिडॉर बंद करू शकतो का?
➡ कायदेशीर अधिकार नाही.
➡ फक्त बळाचा वापर किंवा धमकीद्वारे बंद होऊ शकतो, मात्र अमेरिका याला जोरदार प्रत्युत्तर देऊ शकते.
केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी आश्वासन दिले आहे की, भारताला पर्यायी मागोवून तेल मिळत असून परिस्थिती नियंत्रणात आहे.