दुचाकी चोर जेरबंद!

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

🛵
एमआयडीसी पोलिसांची कामगिरी — दुचाकी चोर जेरबंद!

📌 घटना:
२२ जून रोजी अहिल्यानगरमधील एमआयडीसी परिसरातील एक्साइड कंपनीच्या पार्किंगमधून विलास बबन तुपे (रा. शिंगवे नाईक, ता. नगर) यांची दुचाकी चोरीस गेली होती.

📌 तपासाची दिशा:
एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, घटनास्थळ तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्याचा तपास सुरू केला.

📌 अटक:
पोलिसांनी साईबन रोडवर सापळा रचून कृष्णा रवींद्र निबे (रा. भगवतीपूर, कोल्हार, ता. नगर) याला अटक केली. त्याच्याकडून चोरी गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

📌 पोलीस पथक:
✅ राकेश खेडकर
✅ सचिन आडबल
✅ राजू सुद्रिक
✅ रोहोकले
✅ किशोर जाधव
आदी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

 

👏 एमआयडीसी पोलिसांचे कौतुक!
लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणून नागरिकांचा विश्वास जिंकला.