११ वी प्रवेशासाठी शिक्षण विभागाचे नवीन वेळापत्रक जाहीर!
शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी ११ वीचे प्रवेश संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार

शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी ११ वीचे प्रवेश संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असून, राज्य शासनाने याला मान्यता दिली आहे. यावर्षी पहिल्यांदाच संपूर्ण राज्यभरात ११ वीचे ऑनलाईन प्रवेश सुरु करण्यात येत आहेत.
मूळ वेळापत्रकानुसार, २६ जून २०२५ रोजी प्रथम फेरीतील प्रवेश यादी जाहीर होणार होती. मात्र, शासनाच्या शुद्धीपत्रक क्रमांक प्रवेश १२२५/प्र.क्र.-१६/एसडी-२ दिनांक २३ जून २०२५ नुसार मा. न्यायालयाच्या निर्णयामुळे अल्पसंख्यांक शाळा/महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेबाबत फेरबदल आवश्यक ठरले आहेत.
त्यामुळे काही न्यायालयीन प्रकरणे व तांत्रिक अडचणींमुळे २६ जून रोजीची यादी जाहीर करता येणार नाही. प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा करून प्रक्रिया अधिक पारदर्शक व व्यवस्थित करण्यासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
सुधारित वेळापत्रक (CAP Round 1):
३० जून २०२५
गुणवत्तेनुसार प्रवेश यादी जाहीर होणार
CAP यंत्रणेअंतर्गत Allotment पोर्टलवर यादी अपलोड
Student व College लॉगिनमध्ये तपशील दिसणार
विद्यार्थ्यांना SMS द्वारे माहिती दिली जाईल
कट-ऑफ लिस्टही जाहीर केली जाईल
०१ जुलै ते ०७ जुलै २०२५
विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करणे आवश्यक
०९ जुलै २०२५
दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध रिक्त जागा जाहीर केल्या जातील
महत्वाची सूचना: सर्व विद्यार्थी व पालकांनी अधिकृत संकेतस्थळ व आपल्याला प्राप्त होणाऱ्या SMS वर लक्ष ठेवावे. शंका असल्यास संबंधित शाळा/महाविद्यालयाशी संपर्क साधावा.