काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडींना वेग!
महाराष्ट्रातील पाच बडे नेते दिल्लीत दाखल!
पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर!
३० जून रोजी दिल्लीत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून, आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकट करण्याचे नियोजन सुरू आहे.
बैठकीस उपस्थित नेते:
- हर्षवर्धन सपकाळ (प्रदेशाध्यक्ष)
- विजय वड्डेटीवार
- भाई जगताप
- वर्षा गायकवाड
- यशोमती ठाकूर
- माणिकराव ठाकरे
सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल:
“मराठी ही फक्त भाषा नाही, ती संस्कृती आहे. हिंदी सक्तीचा निर्णय आम्ही मागे घ्यायला लावला – हे आमच्या आवाजाचं यश आहे!”
दादा भुसे प्रकरणावर मोठा आरोप:
“भुसे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांनी गोळी चालवली. सरकारमधील नेत्यांना निर्णयांची कल्पना नसते – हे दुर्दैव आहे.”
गोगावले प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया:
“त्यांचं विधान गंभीर आहे. नारायण राणेंवर कारवाई झाली पाहिजे. ३०२ नुसार गुन्हे दाखल करा!”

महाराष्ट्रातील पाच बडे नेते दिल्लीत दाखल!
पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर!