“माझ्या मुलीचा बळी घेतलास!” – चुलत्याने रागात येऊन पुतणीचा दगडाने ठार केले
श्रीगोंदा-पारनेरमध्ये थरकाप उडवणारी हत्या, जुन्या वादातून रक्तरंजित बदला
पारनेर, ३ जुलै –
जुन्या वादातून सख्ख्या चुलत्यानेच १६ वर्षांच्या पुतणीचा दगडाने डोक्यात मारून खून केल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील माजमपूर गावात उघडकीस आली आहे.
प्रतीक्षा रितेश भोसले (वय १६) असं मृत पुतणीचं नाव असून, या खुनामागचं कारण पाहून संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.
फिर्यादी रितेश ठुब्या उर्फ सुभाष भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या भाचीकडे (आरोपी आशिष उर्फ आबड्या ठुब्या भोसले – वडील व उर्कुलस जलद्या काळे – सासरे) एक महिना आधी जलाशयात पडून मृत्यू झाल्याचा राग होता.
त्यांना वाटत होतं की, त्यांच्या मुलीच्या मृत्यूस प्रतीक्षा कारणीभूत आहे. हाच सूड उगवत त्यांनी १ जुलैच्या रात्री प्रतीक्षाच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्दय खून केला.
या घटनेने गावात खळबळ उडाली असून, पारनेर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि निरीक्षक समीर बारवकर यांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
#हत्या #BreakingNews #CrimeAlert #ShockingMurder #MetroNewsExclusive #पारनेर #श्रीगोंदा #ViralStory