“काळी हुडी, काळे मास्क आणि 7 दुकानं लुटून चोरटे गायब!”

सकाळी दुकानदार जागे झाले, पण रोकड उडालेली होती – सीसीटीव्हीत कैद झालेली धक्कादायक चोरी!

“काळी हुडी, काळे मास्क आणि 7 दुकानं लुटून चोरटे गायब!”

सकाळी दुकानदार जागे झाले, पण रोकड उडालेली होती – सीसीटीव्हीत कैद झालेली धक्कादायक चोरी!

अहिल्यानगर | ३ जुलै
बुधवारी पहाटे २ वाजता काळ्या हुडी आणि मास्क घालून आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड परिसरात धुमाकूळ घालत सात दुकाने फोडून लाखोंची रोकड लंपास केली! थरारक चोरी कोतवाली पोलिसांसमोर सीसीटीव्हीत कैद झाली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

संजय लुणिया यांच्या ‘नवाकार’ नावाच्या दुकानातून सुरू झालेल्या या चोरीसत्रात एकूण सात दुकाने फोडण्यात आली. सकाळी ९ वाजता दुकान उघडण्यासाठी आलेल्या कामगाराने उघडं शटर पाहून घात लक्षात आणला.

या चोरट्यांनी मास्क व हुडीच्या आड चेहरा लपवून सिसिटिव्ही कॅमेर्‍यालाही चकवा दिला. गेट फोडताना आणि शटर उघडताना त्यांचे हालचाली स्पष्ट दिसतात. पण चेहरा ओळखणं शक्य नाही!

फोडलेल्या दुकानांतून काही ठिकाणी हजारो रुपये, तर एका व्यापाऱ्याकडून तब्बल ६ लाख रुपये चोरून नेण्यात आले आहेत.


“हुडीमधून गुन्हेगारी – स्टाईल की चोरीचा नवा फंडा?”

आजच्या पिढीत स्टाईल म्हणून प्रसिद्ध असलेली “काळी हुडी”, आता चोरट्यांची ‘डिफेन्स लाईन’ बनली आहे. सीसीटीव्हीला चकवा देण्यासाठी ही हुडी व मास्कचा वापर वाढताना दिसतोय. त्यामुळे पोलिसांसाठी ओळख पटवणं होऊन बसलंय मोठं चॅलेंज!


 

#BlackHoodGang #CCTVTheft #MarketYardLoot #ViralNews #MetroNewsExclusive #Ahilyanagar #7ShopsRobbed #ChorCapturedOnCCTV