शहीदांसाठी हिरव्या स्मृतींचा सलाम!
🌳 हिवरेबाजारमध्ये “एक पेड शहीदों के नाम” उपक्रमांतर्गत ५१ पिंपळांची लागवड 💚 जय हिंद फाउंडेशनचा पुढाकार | पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रेरणादायी उपस्थिती
शहीदांसाठी हिरव्या स्मृतींचा सलाम!
हिवरेबाजारमध्ये “एक पेड शहीदों के नाम” उपक्रमांतर्गत ५१ पिंपळांची लागवड
जय हिंद फाउंडेशनचा पुढाकार | पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रेरणादायी उपस्थिती
अहिल्यानगर | मेट्रो न्यूज प्रतिनिधी
देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या शहीद वीरांना अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली!
हिवरेबाजारमध्ये “एक पेड शहीदों के नाम” या भावनिक उपक्रमांतर्गत ५१ पिंपळांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगर यांच्या वतीने राबविण्यात आला.
पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे, तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. प्रत्येक झाड शहीदाच्या आठवणीचं आणि देशभक्तीचं प्रतीक ठरणार आहे.
झाडं बोलतील शौर्यकथा!
पद्मश्री पवार म्हणाले, “शहीद जवानांच्या स्मृती वृक्षाच्या रुपात हिवरेबाजारमध्ये कायम राहतील.” वीरांच्या पराक्रमाने आजच्या तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळेल, असं त्यांनी सांगितलं.
जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे यांनी सांगितले की, संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. झाडं ही केवळ पर्यावरणासाठी नव्हे, तर शौर्याच्या स्मृती जपणारी साक्षीदार ठरणार आहेत.
सैनिक कल्याण अधिकारी कोरडे यांनी म्हटलं की, प्रत्येक गावात हा उपक्रम झाला पाहिजे – यामुळे आजी-माजी सैनिकांविषयीचा सन्मान वाढेल.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर – वीर माता गोधाबाई नरवडे, सरपंच विमल ठाणगे, मेजर एकनाथ माने, रोटरी अध्यक्ष सुभाष गर्जे, अंबादास कांडेकर, बशीर शेख, श्रेया गर्जे, समृद्धी पालवे आदी मान्यवरांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
एक पेड… एक स्मृती… एक प्रेरणा!
