ग्रामीण टॅलेंटचा सन्मान!
🎤 साहित्य, समाजसेवा, शिक्षण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील चमकत्या व्यक्तींना पुरस्कार! 👨⚖️ पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ॲड. सुरेश लगड यांची निवड
ग्रामीण टॅलेंटचा सन्मान!
साहित्य, समाजसेवा, शिक्षण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील चमकत्या व्यक्तींना पुरस्कार!
पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ॲड. सुरेश लगड यांची निवड
अहिल्यानगर | मेट्रो न्यूज प्रतिनिधी
निमगाव वाघा (ता. नगर) येथे येत्या रविवार, 6 जुलै रोजी होणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात अनेक प्रतिभावान, कर्तृत्ववान आणि समाजहितासाठी झटणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
या विशेष पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी ही माहिती दिली.
ॲड. सुरेश लगड हे केवळ कायद्याचे जाणकारच नाहीत, तर समाजसेवा, नेतृत्व आणि सामाजिक चळवळीतही सक्रीय भूमिका बजावत असतात. अनेक सामाजिक संस्थांचे ते मार्गदर्शक आहेत.
या सोहळ्यात दिले जाणारे प्रमुख पुरस्कार:
- जगद्गुरु संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार
- वारकरी भूषण पुरस्कार
- राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार
- समजारत्न पुरस्कार
हे पुरस्कार साहित्य, सामाजिक कार्य, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कला, क्रीडा, उद्योग अशा विविध क्षेत्रांत असाधारण योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिले जाणार आहेत.
ग्रामीण भागातील छुप्या हिरोंचा सन्मान करणारा हा सोहळा केवळ सन्मान नाही, तर नव्या पिढीसाठी एक प्रेरणास्रोत ठरणार आहे.
निमगाव वाघा – रविवार, 6 जुलै | सकाळी 11 वाजता | परिवार मंगल कार्यालय
