४.१४ कोटींचा स्कॅम! जिल्हा परिषद आरोग्य विभागात मोठा घोटाळा उघड
👉 ५६ जणांना नोटिसा – १८ जुलैपर्यंत वेळ, नाही भरली रक्कम तर थेट कायदेशीर कारवाई!
४.१४ कोटींचा स्कॅम! जिल्हा परिषद आरोग्य विभागात मोठा घोटाळा उघड
५६ जणांना नोटिसा – १८ जुलैपर्यंत वेळ, नाही भरली रक्कम तर थेट कायदेशीर कारवाई!
अहिल्यानगर | प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तब्बल ४.१४ कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या फरकाच्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप असून, यातून २.३४ कोटींचा थेट घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे.
या गंभीर प्रकरणात ५६ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी १८ जुलैपर्यंत रक्कम परत करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई अटळ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
घोटाळ्याचे तपशील –
या प्रकरणाची चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे यांच्या समितीने केली. चौकशीत शेंडी, मवेशी, कोतूळ आणि तालुका आरोग्य कार्यालय अकोले याठिकाणी अफरातफर झाल्याचे आढळून आले.
सुरुवातीला केवळ ३ जणांचं नाव समोर आलं होतं. मात्र चौकशी वाढत गेली तशी आकडेवारीही वाढली आणि आता एकूण ५६ जणांवर आरोप ठोस आहेत.
त्यात कनिष्ठ सहाय्यक मंदार पावडे, भीमाशंकर देशमुख, अरुण गायकवाड यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
१८ जुलै – डेडलाइन!
प्रत्येकावर विशिष्ट रक्कम वसुलीची जबाबदारी टाकण्यात आली आहे. १८ जुलैपर्यंत रक्कम भरली नाही, तर जिल्हा परिषद थेट कायदेशीर मार्गाने पुढे जाणार आहे.
