सावेडीकरांची ‘लाईट’ गेली कुठे? सबस्टेशन उभं झालं, पण वीज गेली शेंडीला!
2015 पासून जागा दिली, तरीही सावेडी अंधारात का?
मयूर मेहता | अहिल्यानगर
सावेडी उपनगरातील वाढती लोकसंख्या आणि वीज मागणी लक्षात घेता, महावितरणने २०१५ मध्ये महापालिकेकडे अर्धा एकर जागेची मागणी केली होती, पण महापालिकेने ‘दूरदृष्टी’ दाखवत थेट २ एकर जागा दिली. त्यावर भिस्तबाग सबस्टेशन उभारलेही गेले.
पण गंमत अशी की, सावेडीकरांसाठी उभारलेल्या या स्टेशनवरून वीज वडगाव गुप्ता आणि शेंडीसारख्या ग्रामीण भागात वळवण्यात आली!
सावेडीच्या लोकांना मात्र अजूनही लाईट पुरवठा खंडित, व्होल्टेज कमी, अंधारातच जीवन!
भिस्तबाग, निर्मलनगर भागात थोडी वीज मिळते, पण बाकीचा सावेडी उपनगर अंधारातच.
सावेडीकरांची अंधारात वाटचाल सुरूच…
महापालिकेने कधीच उपाय केला – २ एकर जागा दिली, पण महावितरणकडून स्मार्ट प्लॅनिंगचा अभाव.
सावेडी, सारसनगरसह प्रोफेसर चौक, बोल्हेगाव, गुलमोहर रोड, रासने नगर, बुरूडगाव रोड – या सर्व ठिकाणी नागरिक हैराण झालेत.
महावितरणचा स्पष्टीकरण मोड – ‘जागा दिलीय, पण मागणी जास्त आहे!’
महावितरणचे कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण म्हणतात –
“लोकवस्ती वाढतेय, त्यामुळे अजून सबस्टेशन्स हवे आहेत. महापालिकेने नवीन २ ठिकाणी जागा दिली असून काम सुरू आहे.”
शहराला १० सबस्टेशन्स, तरीही विजेची बोंब?
अहिल्यानगर शहराला सध्या एमआयडीसी, केडगाव, सोलापूर रोड, सावेडी, भिस्तबाग यांसारख्या १० सबस्टेशनवरून वीजपुरवठा होतो.
तरीही सावेडी व सारसनगरसारख्या मुख्य भागांमध्ये अंधाराची लाट कायम.
सावेडीकरांनी आता आवाज उठवायची वेळ आलीये!
महापालिकेने जागा दिलीय, आता महावितरणने जबाबदारी घ्या!

सावेडीकरांची अंधारात वाटचाल सुरूच…
महावितरणचा स्पष्टीकरण मोड – ‘जागा दिलीय, पण मागणी जास्त आहे!’
सावेडीकरांनी आता आवाज उठवायची वेळ आलीये!