२५ कोटी कामगार उद्या घेणार देश ठप्प! बँका, पोस्ट, ट्रान्सपोर्ट, कोळसा, महामार्ग सेवा होणार बंद!
२५ कोटी कामगार रस्त्यावर उतरतील
२५ कोटी कामगार उद्या घेणार देश ठप्प! बँका, पोस्ट, ट्रान्सपोर्ट, कोळसा, महामार्ग सेवा होणार बंद! ![🚨]()
देशभरात उद्या मोठा बवाल होणार आहे! बँका, पोस्ट, कोळसा खाणी, महामार्ग, बांधकाम आणि ट्रान्सपोर्टसह अनेक क्षेत्रातील तब्बल २५ कोटी कामगार रस्त्यावर उतरतील आणि देशव्यापी संप करणार आहेत.
दहा मोठ्या केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांचे समर्थक संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे!
त्यांचे म्हणणे आहे की –
“सरकारचे कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिणे धोरण देशासाठी घातक आहेत… त्याविरोधात आता थेट मैदानात उतरण्याची वेळ आली आहे!”
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या अमरजीत कौर म्हणाल्या की, २५ कोटींपेक्षा जास्त कर्मचारी आणि कामगार संपात सहभागी होणार आहेत, तर ग्रामीण भागात शेतकरीही आंदोलनात सहभागी होतील.
हिंद मजदूर सभेचे हरभजन सिंह सिद्ध यांनी सांगितले की –
“बँकिंग, पोस्ट, कोळसा खाणी, कारखाने, सार्वजनिक परिवहन या सेवा उद्या ठप्प होतील!”
उद्याचा दिवस देशासाठी निर्णायक ठरणार आहे!
#IndiaBandh #WorkersProtest #25CroreVoices #BharatBandh2025 #LabourRights #SocialImpact
