
गोडसेच्या उदात्तीकरणाचा गंभीर आरोप!
पुणे स्टेशन परिसरातील धक्कादायक घटना!
एका माथेफिरूने महात्मा गांधींच्या पुतळ्याची कोयत्याने केली तोडफोड – देशात संतापाची लाट!
प्रवीण कुंटे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) म्हणतात:
“२०१४ नंतर देशात महात्मा गांधींविरोधात कट्टरता आणि गोडसेपुराण सुरू झालंय!
अशा विकृत विचारांना खतपाणी घालणाऱ्यांचा बंदोबस्त होणं अत्यावश्यक आहे.”
“गांधींचं चारित्र्यहनन करणारे लेख, संभाषणं, व्हिडीओ हे देशविघातक आहेत – अशांना तुरुंगात टाकायला पाहिजे!”
गांधी हे फक्त स्वातंत्र्य चळवळीचे नेते नव्हते, तर भारतीय विचारविश्वाचे नैतिक अधिष्ठान होते.
पण काही संघटना अजूनही गांधीद्वेषाच्या विषावर पोसल्या जात आहेत.
सुरज शुक्लासारखे ‘विखारी’ लोक गांधींच्या भारताला डाग लावत आहेत!
त्यांना वेळीच रोखलं नाही, तर उद्या संविधानावरच घाला येणार!