रक्तविना क्रांतीची ताकद… भारतीय संविधानाची शान!
महाराष्ट्र विधानसभेत ऐतिहासिक क्षण! देशाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांचा आज विधिमंडळात अभूतपूर्व सत्कार!


महाराष्ट्र विधानसभेत ऐतिहासिक क्षण!
देशाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांचा आज विधिमंडळात अभूतपूर्व सत्कार!
“संविधानात अशी ताकद आहे की रक्तपाताशिवायसुद्धा क्रांती घडू शकते!” – सरन्यायाधीश गवई यांचे ठाम उद्गार 
न्याय, कार्यपालिका, विधिमंडळ – तीनही स्तंभ संविधानाच्या मूल्यांप्रमाणे चाललेत, ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
सत्कार समारंभाला उपस्थित होते:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री अजित पवार
एकनाथ शिंदे
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
केंद्रीय मंत्री रामदास आठवले व अनेक खासदार-आमदार
वडिलांचं आणि नागपूरचं आठवून गवई झाले भावुक… “मी आजही संविधानाचा विद्यार्थी आहे,” असं नम्रतेनं सांगताना टाळ्यांचा गजर झाला 
या भाषणातून नव्या पिढीला संविधानाची खरी ओळख आणि स्फूर्ती मिळतेय!