भारतीय संविधान = रक्तपाताशिवाय क्रांती!

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र विधिमंडळात थाटात सत्कार!

🛑
भारतीय संविधान = रक्तपाताशिवाय क्रांती! 🇮🇳
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र विधिमंडळात थाटात सत्कार!

📢 “संविधानात एवढी ताकद आहे की रक्त न सांडता क्रांती घडू शकते,” – सरन्यायाधीश गवई यांचे सडेतोड वक्तव्य!

🎤 यावेळी त्यांनी न्याय, कायदे आणि कार्यकारी मंडळ यांनी संविधानाला जपल्याचा अभिमान व्यक्त केला.
📜 “मी आजही संविधानाचा विद्यार्थी आहे,” असं नम्र पण ठामपणे त्यांनी सांगितलं.

👥 सभागृहात उपस्थित मान्यवर:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदींच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक क्षण अनुभवला गेला.

🏡 भाडेपट्टा कायदा रद्द → लाखो गरिबांना मिळाल्या स्वतःच्या जमिनी
⚖️ महार वतन उच्चाटन कायदा → दलितांना जमीनमालकी

👨‍👦 वडिलांची आठवण काढत गवई म्हणाले, “माझ्या वडिलांचं विधिमंडळाशी ३० वर्षांचं नातं होतं. नागपूरच्या झोपडपट्टीत वकील म्हणून काम करताना न्यायासाठी संघर्ष केला.”

 

💬 “हा क्षण ‘न भूतो न भविष्यति’ – असाच आहे!”