BIG BREAKING | Gujarat Bridge Collapse बडोदा जिल्ह्यात भीषण दुर्घटना – पूल कोसळला, वाहने थेट नदीत!
आज सकाळी साडेसातच्या सुमारास गुजरातमधील बडोदा जिल्ह्यात 40 वर्षांपूर्वीचा पूल अचानक कोसळला.

बडोदा जिल्ह्यात भीषण दुर्घटना – पूल कोसळला, वाहने थेट नदीत!
आज सकाळी साडेसातच्या सुमारास गुजरातमधील बडोदा जिल्ह्यात 40 वर्षांपूर्वीचा पूल अचानक कोसळला.
2 ट्रक आणि 2 कार नदीत कोसळल्या.
11 जणांचा मृत्यू – यात दोन भाऊ व एका चिमुकल्याचा समावेश.
5 जण गंभीर जखमी.
हा पूल मध्य गुजरातला सौराष्ट्रशी जोडणारा एकमेव दुवा होता – आता संपर्क तुटला आहे.
पूल 1985 साली बांधण्यात आला होता.
पंतप्रधान मोदींनी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाइकांना ₹2 लाख व जखमींना ₹50 हजार मदतीची घोषणा केली आहे.
सुरक्षेच्या नावावर इतकी मोठी चूक? जबाबदार कोण?
या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.