भाजपने ‘टायगर’ टी. राजा सिंह यांचा राजीनामा स्वीकारला!

तेलंगणातील गोशामहलमध्ये राजकीय भूकंप!

🚨
भाजपने ‘टायगर’ टी. राजा सिंह यांचा राजीनामा स्वीकारला! 🚨

तेलंगणातील गोशामहलमध्ये राजकीय भूकंप!

तेलंगणाचे आक्रमक हिंदुत्ववादी नेते टी. राजा सिंह यांनी भाजपच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता – आता बीजेपीने तो स्वीकारलाय! 😱

📌 कसला होता वाद?
३० जून रोजी तेलंगणा भाजप अध्यक्षपदी एन. रामचंद्र राव यांची निवड झाल्यावर राजा सिंह चिडले!
“पक्षाने कार्यकर्त्यांची मतं डावलून चुकीचं नेतृत्व निवडलं” – असा थेट आरोप त्यांनी केलाय.

📌 कोण आहेत राजा सिंह?
➡️ गोशामहलमधून सलग तीन वेळा आमदार – 2014, 2018 आणि 2023
➡️ कट्टर हिंदुत्ववादी नेता – गोरक्षण, श्री राम युवा सेना, बजरंग दलशी नाते
➡️ अनेक वादग्रस्त विधानं, पैगंबर मोहम्मद वादामुळे अटकही
➡️ भाजपने निलंबन केलं होतं – पण 2023 निवडणूकपूर्वी पुन्हा सामावून घेतलं

📍 गोशामहल – हैदराबादमधील हिंदूबहुल मतदारसंघ, जिथे AIMIMचे असदुद्दीन ओवैसी खासदार आहेत.

 

🗣️ आता भाजपा आणि राजा सिंह यांचं नातं संपलंय!
पुढचं पाऊल काय? स्वतःचा पक्ष? की नवीन संघटना?
नजर ठेवा – तेलंगणात मोठी राजकीय हालचाल होऊ शकते!