AI तंत्रज्ञानाचा मोठा फसवणूक प्रकरण!

विश्वास नांगरे पाटील यांचा खोटा चेहरा वापरून वृद्ध दाम्पत्याचा 78 लाखांचा गंडा

AI तंत्रज्ञानाचा मोठा फसवणूक प्रकरण! विश्वास नांगरे पाटील यांचा खोटा चेहरा वापरून वृद्ध दाम्पत्याचा 78 लाखांचा गंडा

धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमधील एका सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याला आणि त्याच्या पत्नीला AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापरून बनवलेल्या खोट्या व्हिडिओ कॉलने ७८ लाख ६० हजार रुपये फसवले गेले आहेत.

या फसवणुकीत विश्वास नांगरे पाटील यांचा चेहरा नकली AI तंत्रज्ञानाने तयार केला होता, ज्यामुळे दाम्पत्याला वाटलं की नांगरे पाटील स्वतःच बोलत आहेत. डिजिटल अरेस्ट आणि दहशतवाद्यांच्या नावाने भीती दाखवून सात दिवस सातत्याने फोनवर धमकावलं गेलं, आणि बँक खात्यात संशयास्पद २० लाख रुपयांचे व्यवहार केले असल्याचा बनाव केला गेला.

सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांची पत्नी यांना ही फसवणूक करताना सायबर गुन्हेगारांनी अगदी धाडसाने काम केलं. हा प्रकार क्रांती चौक पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला असून, सध्या तपास सुरू आहे.

AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करून केल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून सजग राहण्याची गरज आता सर्वांनाच भासत आहे! तुम्हाला अशा प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी काय उपाय करायला हवेत, यावर तुमचे विचार काय?