‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ कुणाचा?

ऑगस्टमध्ये फायनल फैसला होणार!

🚨
सुप्रीम कोर्टमधून Big Breaking! ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ कुणाचा? ऑगस्टमध्ये फायनल फैसला होणार!

उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे — ‘शिवसेना कोणाची?’ आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह कुणाला मिळणार? या महाभारताला आता निर्णायक टप्पा आलाय! सुप्रीम कोर्ट ऑगस्टमध्ये या प्रकरणाचा निकाल लावणार आहे.

📌 काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या दोन वर्षांपासून शिवसेना नाव आणि चिन्हावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात कोर्टामध्ये टायट फाईट सुरु आहे. पण आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की, “बास झालं! आता वेळेचा खेळ नको – ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी होईल.”

आजच्या सुनावणीत न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले:

हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. आता पुन्हा-पुन्हा अर्ज करू नका. ऑगस्टमध्ये मुख्य सुनावणी घेणार आहोत.

🧑‍⚖️ ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि रोहित शर्मा तर शिंदे गटाकडून मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांचं जोरदार युक्तिवाद चालू आहे. आता काही दिवसांत कोर्ट ऑगस्टची अंतिम तारीख जाहीर करणार आहे.

📅 महानगरपालिका निवडणुका जवळ आल्यामुळे या केसचा निर्णय प्रचंड महत्त्वाचा ठरणार आहे.

👁️ सगळ्यांच्या नजरा आता सुप्रीम कोर्टाकडे!
‘धनुष्यबाण’ शिंदेंकडेच राहणार की पुन्हा ठाकरे गटाला मिळणार?
या सगळ्यावर शिक्कामोर्तब लवकरच होणार आहे!

#ShivSenaBattle #DhanushyabaanFight #SupremeCourtVerdict #ThackerayVsShinde #MetroNewsExclusive #BreakingMarathi #PoliticalShowdown