ब्रेकिंग! राज ठाकरेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून थेट DGPकडे तक्रार
व्हिडीओ न काढण्याचं वक्तव्य ठरलं अडचणीत आणणारं?
ब्रेकिंग! राज ठाकरेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून थेट DGPकडे तक्रार – व्हिडीओ न काढण्याचं वक्तव्य ठरलं अडचणीत आणणारं?
वरळी डोममध्ये 5 जुलै रोजी राज ठाकरे यांनी दिलेलं “मारहाण करताना व्हिडीओ काढू नका” हे वक्तव्य आता त्यांच्या अंगाशी आलं आहे. मराठीची बाजू घेणाऱ्या या भाषणावरून आता थेट महाराष्ट्र DGPकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
त्रिभाषा धोरणावरून राज्यात वादंग माजले होते. हिंदी सक्तीविरोधात आवाज उठवणाऱ्या राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत विजयी मेळावा घेतला. पण या मेळाव्यात केलेल्या काही बोलक्या ओळींवरून वाद निर्माण झाला आहे.
राज ठाकरेंनी भाषणात म्हटलं:
“काल एका व्यापाऱ्याच्या कानफडात मारली… समोरचा गुजराती निघाला… त्यांना मराठी आलीच पाहिजे… पण चूक त्यांची असली पाहिजे. अशी कधी गोष्ट केली, तर त्याचे व्हिडीओ काढू नका… आपल्यातच त्यांना कळलं पाहिजे.”
यावरच काही मंडळींनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली आहे.
सोशल मीडियावर काय चाललंय?
राज ठाकरेंचं हे “मारहाण – पण व्हिडीओ नको!” स्टेटमेंट सध्या नेटिझन्सच्या चर्चेचा विषय ठरत आहे. काहींनी त्यांना पाठिंबा दिला, तर काहींनी थेट द्वेषाची भाषा केल्याचं म्हणत विरोध केला.
पोलिसांत तक्रार म्हणजे काय पुढचं पाऊल असू शकतं?
हे प्रकरण आता कायदेशीर वळण घेण्याची शक्यता असून, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
#RajThackeray #DGPComplaint #PoliticalControversy #MarathiPride #MetroNews #ViralNews #BreakingMarathi
शेतीविषयक माहिती साठी कृषी क्रांती ला भेट द्या
