BREAKING | जिल्हा परिषद निवडणूक अपडेट | प्रारूप प्रभाग रचनेवर ‘5 हरकती’
अहिल्यानगर : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी 14 जून रोजी जाहीर केलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभाग रचनेविरोधात जिल्हाभरातून आतापर्यंत फक्त 5 हरकती प्राप्त झाल्या आहेत.

21 जुलैपर्यंत नागरिकांना गट-गणातील बदलांविषयी हरकती व सूचना देण्याची अंतिम मुदत आहे.
प्रमुख तक्रारींचा आढावा :
वडनेर बुद्रुक – अपेक्षित निघोज ऐवजी अळकुटी गणात समावेश
पाठवाडी – जवळा ऐवजी निघोज गणात टाकल्याची तक्रार
लहित खुर्द – ब्राम्हणवाडा ऐवजी कोतूळ गणात घ्यावे, सरपंचांची मागणी
गुहा गट – पूर्वीचे नाव ‘सात्रळ गट’ पुन्हा द्यावे
डोंगरगण – जेऊर गटात न घेण्याची मागणी
ही रचना 2011 च्या लोकसंख्येच्या आधारे करण्यात आली असून जिल्ह्यात 75 गट व 150 गण निश्चित करण्यात आले आहेत.
28 जुलै – प्राप्त हरकतींसह अभिप्राय विभागीय आयुक्तांकडे
11 ऑगस्ट – सुनावणी
18 ऑगस्ट – अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे
गटात तुमच्या गावाचा समावेश योग्य आहे का? तुमचा आवाज आता नोंदवा!