श्रीगोंदा LIVE! गावठी दारूच्या अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई – तब्बल 17 लाखांचा मुद्देमाल जप्त
गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर अचानक छापे



श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी परिसरात दारू बनवणाऱ्यांचे धाबे दणाणलेत! राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 17 जुलै 2025 रोजी गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर अचानक छापे टाकले आणि संपूर्ण रॅकेट उध्वस्त केलं.
या कारवाईत सुमारे 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात हातभट्टीच्या तयार दारूसह कच्चा माल, साहित्य, बायलेर्स, प्लास्टिक ड्रम्स आणि बनावट बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
ही ऑपरेशन झाली अधिक्षक प्रमोद सोनोने आणि उपअधिक्षक प्रवीणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली. अॅक्शनमध्ये सहभागी होते – निरीक्षक एस.आर. कुसळे, बी.एस. घुगे, दुय्यम निरीक्षक आर.व्ही. झोळ, व्ही.एस. वराठा, आर.एम. पारधे, सुरज पवार, योगेश मडके, चतुर पाटोळे आणि संपूर्ण स्पेशल टिम.
यामुळे गावठी दारूचे रॅकेट खिळखिळे झाले असून स्थानिकांमध्येही या कारवाईबाबत समाधान व्यक्त केलं जात आहे.
काय सांगता?? अजूनही काही भागांत अशी अवैध दारू तयार होते??
राज्य उत्पादन शुल्क विभाग आता पूर्णपणे सक्रिय मोडमध्ये आहे!
सोशल मीडियावर #LiquorRaid #Kashti #IllegalLiquor #ExciseDepartment अशा हॅशटॅग्ससह ही बातमी सध्या जबरदस्त व्हायरल होतेय!
कायदेशीर कारवाई सुरू असून पुढील तपास अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
पहा. वाचा. शेअर करा. अवैध धंद्याला ठोसा द्या!