ब्रेकिंग न्यूज! आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल – विधानभवनातील वादाचा मोठा परिणाम
मुंबईत सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे!


मुंबईत सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे! राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना घडली मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशन हद्दीत – काल विधानभवनात मोठा वाद झाला होता. आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले यांच्यात तुफान राडा झाला. देशमुख यांना जोरदार मारहाण झाली, शर्टही फाटला.
या वादानंतर पोलिसांनी नितीन देशमुख यांना ताब्यात घेतलं आणि रात्री मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला नेत असताना – तिथेच जितेंद्र आव्हाड आडवे झोपले, पोलिसांची जीप थांबवली! हे सगळं प्रकरण चांगलंच तापलं.
त्यामुळे पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेऊन ही कारवाई झाली आहे.
या सगळ्या घटनेवर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. खुद्द गोपीचंद पडळकर यांनीही आपल्या कार्यकर्त्याच्या वागणुकीसाठी दिलगिरी व्यक्त केली. पण जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनातच आमदार सुरक्षित नाहीत, असा गंभीर आरोप केला आहे.
राजकारणातला हा थरार सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय! #JitendraAwhad #NCP #MumbaiPolitics #BreakingNews #VidhansabhaDrama #PoliticalClash